WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

नैतामगुड्यातील ७० महिलांना इको- फ्रेंडली सॅनिटरी नॅपकिनचे मोफत वितरण

Image

गडचांदूर-रफिक शेख प्रतिनिधी - अर्थ ग्रामीण आरोग्य व संशोधन संस्थान गडचांदूर, आरुण्य बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर, रि-यूनाइट फाउंडेशन गडचांदूर आणि जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी यांच्या संयुक्त विद्यमाने बिबी गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या नैतामगुडा येथे इकोफ्रेंडली सेनेटरी नैपकिनचे मोफत वितरण, मोफत आरोग्य तपासणी शिबीर, औषधी वितरण तथा आरोग्य जनजागृती करण्यात आली. १०० टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या या गावात शिबिराला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.
आरुण्य संस्थेच्या डॉक्टर चमूकडून शंभराहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आला. तसेच मोफत औषधी वितरण करण्यात आले. तसेच अर्थ संस्थेकडून तयार करण्यात आलेल्या सखी स्वराज्य इकोफ्रेंडली सेनेटरी नैपकिनचे ७० महिलांना वितरण करण्यात आले. सदर खर्च ग्रामपंचायतीने उचलला. तसेच महिलांना मासिक पाळीबद्दल आरोग्य शिक्षण देण्यात आले. शिबिरादरम्यान रि-यूनाइट फाउंडेशन तर्फे उपस्थित रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा स्मार्ट ग्राम बिबीचे उपसरपंच प्रा.आशिष देरकर, गडचांदूर नगर परिषदेचे माजी सभापती तथा नगरसेवक हरिभाऊ मोरे, अर्थ फाऊंडेशनचे संचालक डॉ. भूषण मोरे, आरूण्य संस्थेचे संचालक डॉ. प्रदीप रॉय, माजी सरपंच मारुती नैताम, गाव पाटील राजू नैताम, तंटामुक्त समितीचे सदस्य धर्मा कोटनाके, नंदलाल मडावी, अनुराग शर्मा, डॉ. लालकृष्ण मुलवानी, हिमांशु जोगलेकर, डॉ. रानी बोबडे, रियूनाइट टीमचे राजीव पावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
मोफत आरोग्य शिबिराचा लाभ मिळाल्यामुळे गावातील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. कोरपना तालुक्यात नैतामगुडा या गावापासून आरोग्य शिबिरांना सुरुवात झाली असून तालुक्यातील सर्व आदिवासी खेड्यापाड्यांमध्ये अशा प्रकारची आरोग्य शिबिरे राबवण्यात येणार असल्याचे अर्थ फाऊंडेशनचे संचालक डॉ. कुलभूषण मोरे यांनी सांगितले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share