WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मोफत कर्करोग पूर्व निदान शिबिराचा पहिल्या दिवशी घेतला ऐकुन 115 महिलांनी लाभ

Image

        रोटरी क्लब ऑफ ब्लेक डाइमंड सिटी वणी आणि जगती मिन्रल्स प्राइवेट लिमिटेड अडेगाव यांच्या संयुक्त वीद्यमाणाणे दिनांक 26 जुलै ते 28 जुलै 2019 पर्यंत मोफत कर्करोग पूर्व निदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे  

 त्यामध्ये आज पहिल्या दिवशी मौजा मुकुट्बण येथे राम मंदिर परिसरात आयोजित शिबिरात अद्यावत मेमौग्रफि बस मध्ये ऐकुन 115 महिलांनी महिला डॉक्टर्स मार्फत तपासणी करून घेतली.

सदर शिबिराचे यशश्वी करिता मौजा मुकुट्बण येथील श्री गजानन उत्तरावर, श्री सुनील उत्तरावर,  श्री. प्रकाश दिकुण्ड्वार सर तसेच ग्रामस्थ महिलांनी मदत केली यावेळी क्लबचे अध्यक्ष रोटे अनिल उत्तरावर,  सचिव रोटे निकेत गुप्ता,  प्रोजेक्ट डाइरेक्टर रोटे अरुण कावड्कर,  कोष्याद्य्क्ष सुधीर साळी,  सदस्य रोटे निकुन्ज अटारा,  विशाल हिरन,  राजेश राठी तथा इतर रोटरी क्लब चे सदस्य हजर होते. तसेच कार्यक्रम करिता जगती मिन्रल्स प्राइवेट लिमिटेड अडेगाव चे अधिकारी सुध्दा हजर होते.

रोटरी क्लब ऑफ ब्लेक डाइमंड सिटी वणी द्वारा पहिल्यांदा मुकुट्बण येथे प्रोजेक्ट घेण्यात आला त्याबद्दल मुकुट्बण वासियांनी क्लब चे आभार मानले.

सदर शिबिर उद्या दिनांक 27 जुलै 2019 रोजी ग्रामीण रुग्णालय मारेगाव आणि दिनांक 28 जुलै 2019 रोजी साई मंदिर यवतमाळ रोड वणी येथे घेण्यात येत आहे त्याचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब द्वारा करण्यात आले आहे .

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share