WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

रिमझिम पावसाने नांदाफाट्यावर घाणीचे साम्राज्य

Image

साफसफाई कडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
डासांच्या उत्पत्तीने आरोग्यावर परिणाम
गडचांदूर-रफिक शेख प्रतिनिधी :- उशिरा का होईना पण जिल्ह्यासह कोरपना तालुक्यात पावसाने हजेरी लावली नांदा या गावात मात्र नाली गटारीत दारूच्या बाटल्या , फेकलेले अन्न , कचरा असल्याने नालीची घाण कचरा वाहून जात नसल्याने डासांची उत्पत्ती होत असल्याने रोगराईचा प्रादुर्भाव वाढला आहे पावसाळ्यात डेंगु ,मलेरिया अशा अनेक आजारांचा सामना नागरिकांना करावा लागतो पावसाळा चालू होऊन महिना लोटला मात्र ग्रापंचायत प्रशासनाने आज पर्यंत नालीवर मच्छरनाशक फवारणी केली नाहीत अनेक नाल्या तुंबल्या असुन सफाईचा अभाव आहे नांदाफाटा चौकात बसनिवार्‍याजवळ घाण उघड्यावर पडून आहेत ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करित असल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून मागील वर्षी डेंगू सारख्या आजाराने नांदा फाटा येथील पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे जातीने लक्ष देण्याची गरज असून गावातील नालीवर मच्छरनाशक फवारणी करून साफसफाई करणे गरजेचे आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share