WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीकरांकडुन कोल्हापूर-सांगलीला मदतीचा हात..... रोटरी क्लब व व्यापारी असोसिएशन वणी चा पुढाकार.....

ImageImage

वणी :- कोल्हापूर सांगली पाण्याचा मोठया प्रमाणात प्रलय असुन त्यामुळे कित्येक कुटूंब एकमेकांपासुन दुर झाले आहेत. कित्येक मृत्यूमुखी पडले आहेत तर काहींच्या जवळचा संपुर्ण आसरा दिसेनासा झाला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सर्वत्र उध्वस्त होउुन परिसरात जलमय वातावरण निर्माण झाले आहेत. हे पाहता रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणी व व्यापारी असोसिएशन, वणी यांनी पुढाकार घेत मदतीचा हात सरसावला असुन दरवर्शी ज्या परिसरात पुर परिस्थिती निर्माण होते अशा ठिकाणी वणी विभागातर्फे सदर संस्था मदतीचा हात सरसावतांना नेहमीच ननिदर्शनास येत असते. त्यामुळे आता देखिल असाच मदतीचा हात देत कुटूंबांना दैनंदिन गरज भागविण्याकरीता साहित्य जमा करित त्यांना पाठविण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहेत.

कोल्हापूर-सांगली व संबंधीत परिसरात निसर्गाचा प्रकोप झाल्यामुळे त्या परिसरातील अंदाजे 770 गावे महापुरात बुडाली असुन नको तेवढे नुकसान झाले आहे. आज तेथील कित्येक कुटूंबाना दैनंदिन गरज भागविण्याकरिता साहित्य उपलब्ध नाही. हे सर्व कुटूंब संकटातुन बाहेर काढण्याकरीता व परत एकदा वणीची मदतीची एतिहासिक परंपरा अबाधित ठेवण्याकरिता सर्वांना मदतीचे आवाहन केले असुन त्याकरीता वणी शहरातील सर्व सामाजिक, व्यापारी संथा, शासकिय, निमशासकीय, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतीक संस्था व प्रतिश्ठित नागरीकांनी एकत्र येउुन सढळ हाताने यथायोग्य होईल ती मदत करावी व नियोजीत मदत टिळक चौक, सत्यम हॉटेलच्या बाजुला केंद्रात पोहचवावे असे आवाहन करण्यात आले आहेत. सदर मदत साहित्य दिनांक 16 ऑगस्ट 2019 ला टिळक चौक येथुन रवाना करण्यात येणार असुन त्यात तुर दाळ, तांदुळ, साखर, चहापत्ती, दुधपावडर, खाद्यतेल पॅकेट, बॅटरी, मेनबत्ती, माचीस बॉक्स, टुथब्रष, टुथपेस्ट, फुडप्लेट्स, साबण, डिटर्जंट पावडर, डेटॉल बॉटल, ब्लॅंकेट, षॉल, विक्स बॉटल, चटई, बेडषीट, मच्छरदानी, मच्छरकॉईल, पॅकींग असलेले फुड पॅकेट, बिस्कीट पॅकेट, ओ.अर.एस. पॅकेट, कपडे (नवीन), उबदार कपउे, लहान मुलांचे कपडे, सॅनेटरी नॅपकीन आदी साहित्य जमेल त्या पध्दतीने सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले असुन सदर साहित्य दिनांक 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2019 या कालावधीत जमा करावयाचे असुन त्याकरीता राकेशभाउ खुराना 9922161616, अनिल उत्तरवार 9822029203, निकेत गुप्ता 9822940858, राजाभाउु पाथ्रडकर 8208815354, अॅड. निलेष चौधरी 9823277096, किसन जैन 8308836430, निखील केडिया 9422165890, अनिल आक्केवार 8275296863, सुधीर साळी 9823027898, लवलेष लाल 9890350193 यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आले असुन सढळ हाताने जमेल तेवढी मदतकार्य वणीकरांतर्फे व्हावे अषी विनंती रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणी व व्यापारी असोसिएषन, वणी यांनी केली आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share