WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

रंगनाथ नगर व खळबळा परिसर समस्येच्या विळख्यात.....

ImageImageImageImageImageImage

नगरसेवकांचे दुर्लक्ष :- विविध कामे राखडूनच, भूमिगत गटार कधी होणार?...

सुरज चाटे वणी :-

वणीतील रंगनाथ नगर व खळबळा परिसर हा दलित वस्ती परिसर म्हणून परिचित असून या नगरात दलित वस्ती निधी अंतर्गत कोट्यवधींचा निधी या वस्ती करिता येत असतो परंतु तो कुठल्या कामावर खर्च होतो हे मात्र कोडेच असून याठिकाणी विविध समस्यांनी आपले डोके वर केले असून रस्त्याच्या समस्या, पाणी समस्या, खंबावरील पथदिव्यांच्या समस्या, काही खांबावर पथदिवे नाही, तर ज्यांना आहे ते अविरत सुरूच राहत आहे, भूमिगत गटारांची समस्या, घरकुलातील पट्यांच्या समस्या, घरकुल समस्या आदी विविध प्रकारच्या समस्या सदर परिसरात असून नगरसेवक व येथील लोकप्रतिनिधी साधा फेरफटका मारताना सुद्धा दिसत नसून यामुळे नागरिकांत मोठा संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे आता निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीकडे गेले असता त्यांनी सुद्धा उडवा उडवीचे उत्तर देत आहे. तर मी सांगितले परंतु त्यांनी केले नाही त्याला मी काय करू? अशा प्रकारची उत्तरे देत असून यामुळे कोट्यवधींचा दलित वस्तीतील निधी हा या परिसरात खर्च न होता दुसऱ्या कामाला खर्च होत आहे तरी वरिष्ठ स्तरातून या दलित वस्तीकडे तातडीने लक्ष देऊन सदर समस्यांचे निराकरण करावे व जनतेस होणारी डोकेदुखी कमी करावे अशी मागणी जनसमान्यांकडून होत आहे.

वणीतील रंगनाथ नगर परिसरातील गुरांच्या दवाखान्या मागे असलेल्या खळबळा परिसरात जाणाऱ्या रोडची अतिशय बिकट अवस्था झाली असून तो संपूर्ण कच्चा रोड असून त्याला मोठं मोठे खड्डे पडले आहे त्यामुळे ये जा करणाऱ्या नागरिकांना हा मार्ग मोठ्या प्रमाणात डोके दुःखी ठरत आहे. तर भूमिगत गटारांची कामे अर्ध्यावरच असून काही ठिकाणी तर हे कामे पोहोचली सुद्धा नसल्याने ही कामे होणार किंवा नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर रंगनाथ नगर परिसर व खळबळा परीसरातील काही भूमिगत गटारांना त्याचे झाकण नसल्याने अशा ठिकाणी सुद्धा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर काही ठिकाणी चक्क रस्त्यावरील सळाख बाहेर निघून आहे कित्येकदा नगरसेवकाना सूचना देऊन सुद्धा याच्या कडे त्यांचे दुर्लक्ष दिसत आहे. घरकुल प्रक्रियेतील पट्टा समस्या कित्येक दिवसापासून रखडलेली असून त्यांवर सुद्धा उडवा उडवीचे उत्तर मिडते आहे, जर जनतेच्या कामांकरिता लोकप्रतिनिधी नाही तर हे लोकप्रतिनिधी कशाकरिता? असा सवाल नागरिकांत आहे.

खांब्यावरील पथदिवे कुठे आहे तर कुठे नाही अशी अवस्था असून जिथे आहे तेथील पथदिवे रात्रंदिवस सुरूच राहत असून आता त्याचे बिलाचा भुर्दंड नेमका कुणाला बसत आहे हा चर्चेचा विषय असून पथदिवे अविरत सुरू असल्याने ते जास्त दिवस न चालता लवकरच त्यात बिघाड येत असल्याचे चित्र सुद्धा निदर्शनात येत आहे.

अशा सर्व समस्यांनी सदर परिसर वेढला असून आता या समस्यांकडे लक्ष देणार तरी कोण? असा सवाल जनसामान्यांत असल्याने तातडीने रखडलेले व आवश्यक असे विविध कामे त्वरित सुरू करण्याची मागणी होत असून संबंधित विभागाने व उच्च स्तराहून याची दखल घेऊन सदर दलित वस्तीचा निधी याच वस्तीत खर्च होईल या दृष्टिकोनातून कार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे.

समस्यांचे निराकरण होणार काय?.....

निवडणुका आल्या की लोकप्रतिनिधींच्या वाऱ्या आपल्या नगराच्या दिशेने फिरकताना दिसत असतात परंतु निवडणूक झाली उमेदवार विजयी झाला की हे पदाधिकारी आपल्या परिसरात साधी चक्कर सुद्धा मारताना दिसत नसून पडलेल्या विविध समस्यांचे निराकरण होणार किंवा नाही? असाच संतापजनक सवाल आता नागरिकांतून उठताना दिसत आहे.

रस्त्यावरील निघालेल्या सलाखी देत आहे अपघातास निमंत्रण...

खांबावरचे पथदिवे दिवसा सुद्धा सुरूच...

खळबळा परिसराकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था...

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share