WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

विजेच्या तीव्र झटक्याने दोन महिला दगावल्या....

ImageImage

रंगनाथ नगर व गोकुलनगर परिसरातील घटना...
वणी ;- सुरज चाटे
वणी परिसरातील आज घडलेल्या दोन घटनांनी रंगनाथ नगर परिसर तथा गोकुलनगर परिसरात शोककळा पसरली आहे. एक रंगनाथ नगर परिसरातील कुलरचा शाँक लागुन एका महिलेचा म्रुत्यु झाल्याची खळबळजनक घटना घडली तर दुसरीकडे गोकुळ नगर परिसरातील कमलाबाई पंजाबराव वाघडकर याना दिनांक 11 ला पाण्याची मोटार ला स्पर्श झाल्याने तिचा सुद्धा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे दोघांचा सुद्धा अंत्यविधी वणी येथे झाली.

सध्या पाण्याचा जोरदार सपाटा सुरू असून जिकडे तिकडे पाणीच पाणी असे सुरू असल्याने वणी शहरातील गोकुळ नगर परिसरात स्थित असलेल्या कमलाबाई पंजाबराव वाघडकर वय 45 वर्ष हे दिनांक 11 ला सकाळच्या दरम्यान पाण्याच्या मोटार ला हाथ स्पर्श झाला असता विजेचा तीव्र झटका त्यांना बसला झटका इतका जोरदार होता की त्यांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे साधना हरिदास कौशल्य(50) रा.रंगनाथ नगर वणी असे शाँक लागुन म्रुत झालेल्या महिलेचे नाव आहे.साधना हि दु. 2 वाजताचे दरम्यान आपल्या घरात असतांना कुलरचा शाँक लागला.तिला तात्काळ ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असता डाँक्टरांनी म्रुत घोषित केले.आज दि.12 सप्टेंबरला शवविच्छेदन करुन शव नात्वाईकांच्या ताब्यात दिले आहे, अंत्यविधी आज दिनांक 12 ला करण्यात आला असून त्यांच्या बराच मोठा आप्त परिवार आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share