WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पालिका लघुशंका गृहाची दुरावस्था....

Image

मुत्राला ओलांडत करावं लागतो अभ्यासाचा सामना...

पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष :- तातडीने लक्ष देण्याची गरज....

प्रतिनिधी सुरज चाटे :-

वणीचा मुख्य भाग समजल्या जाणारा डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात पालिकेचा जुना सरकारी दवाखाना असून आता सदर दवाखाना कर्मचाऱ्यांचे क्वार्टर झाले आहे. परंतु याठिकाणी असलेल्या लघुशंका गृहाची अत्यंत दुरवस्था झाली असून लघुशंकेस गेलेल्या इसमाला विचार पडतो की इथे आपली विधी करावे की नाही कारण तिथे पाईप लाईन चोकप झाली असल्याने मूत्र नाली वाटे न जाता उलट दिशेने परिसरात पसरत आहे त्याचा परिणाम येथील विध्यार्थी अभ्यास गट मधील विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात होत असून याला ओलांडत त्यांना आपला अभ्यासाचा प्रवास करावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे तर कित्येकदा येथील युवकांनी पालिकेला लेखी तक्रार दिली आहे. तरी सुद्धा सदर लघुशंका गृहाची कोणतीही दखल घेण्यात आली नाही एवढंच नाही तर या ठिकाणी कोणताही पालिकेचा कर्मचारी साफ सफाई करिता येत नसल्याने पालिका प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचे सुद्धा प्रमाण पसरत आहे.

स्वच्छ सुंदर अभियान चा नारा नगर पालिके तर्फे नेहमीच देण्यात येत असतो त्यावर कोट्यवधींचा निधी सुद्धा खर्च होत असतो मात्र येथील डॉ बाबा साहेब आंबेडकर चौकातील, अभ्यासिका परीसरातील लघुशंका गृहाची अतिशय बिकट अवस्था झाली असल्याने आरोग्याचा, स्वच्छतेचा व सर्वात महत्वाचे म्हणजे येथील अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचा भविष्याचा प्रश्न ऐरणीवर असून याठिकाणी लघुशंका गृहाला गळती लागल्याने सदर लघुशंका गृह हे जुने असल्या कारणाने कोसळण्याची सुद्धा भीती निर्माण झाली असून येथील मूत्र बाहेरच्या दिशेने मार्गक्रमण करीत असून याचा परिणाम आसपासच्या परिसरात होत आहे. आता मात्र त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असून जर या बाबीमुळे एखाद्याचे आरोग्य धोक्यात आले तर यास जाबाबदार कोण? असा संतप्त सवाल उपस्थित होत असून सदर प्रश्नाकडे तातडीने जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असून विध्यार्थ्यांचे अभ्यासाच्या दृष्टीने होणारा त्रास व परिसरातील दुर्गंधी लक्षात घेता स्वच्छ सुंदर भारत चा नारा अबाधित ठेऊन सदर प्रश्न निकाली काढण्याची गरज असल्याचे परिसरात बोलल्या जात आहे.

नगर पालिका प्रशासन दखल घेणार काय?....

लघुशंका गृह अत्यंत दुरावस्थेत असल्याने येथील साफसफाई व लघुशंका गृह योग्य पद्धतीत करून चोकप झालेली पाईप लाईन पूर्ववत करून होणाऱ्या त्रासापासून सदर परिसर मुक्त करण्याची गरज निर्माण झाली असून परंतु नगर परिषद प्रशासन या गंभीर बाबीकडे लक्ष देणार का? असा सवाल मात्र याठिकाणी उपस्थित होत असून पालिकेने गांभीर्याने लक्ष द्यावे असेच बोलल्या जात आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share