WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अखेर वणी पोलिसांनी आरोपीस ठोकल्या बेड्या..

Image

प्रतिनिधी सुरज चाटे :-

रवी नगर येथे प्रेत आढळल्याचे प्रकरण :- सतीश देवासेच्या खुन्याला नागपुरातून अटक...

वणीच्या रवीनगर परिसरात करण कश्यप नामक व्यक्ती भाडेकरू म्हणून होता. दि. 05 ला अनिल आसुटकर यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार वणी पोलिसांनी झाडाझडती घेतली असता तेथे पुरुष जातीचे एक प्रेत आढळून आले.

हे प्रेत नेेमके कुुुणाचे याची पाळताळणी केल्यावर जे समोर आले ते काही वेगळेच होते सतीश देवासे नामक व्यक्ती तिथे राहत होता, हे प्रेत ते तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत होता मात्र काही वेळाने त्याची ओळख पटली परंतु करण कश्यप हा वणीतून गायब झाल्याने तपासाचे चक्र आणखी वेगावले व वणी पोलिसांनी तपासाची उंच झेप घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात नागपूर येथील क्राईम युनिट 4 संतोष खांडेकर व चमू यांच्या मदतीने अवघ्या काही तासातच वणी पोलिसांनी सदर घटनेचा छळा लावला असून याच आठवड्यातील ही दुसरी मोठी कामगिरी वणी पोलिसांनी केली आहे, सदरची कार्यवाही मा. एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक यवतमाळ व मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री नुरूल हसन, सा. मा. श्री सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी वणी, यांचे मार्गदर्शनात पो. नि. वैभव जाधव, सपोनि माया चाटसे, डी.बी.पथक कर्म पोउपनि गोपाल जाधव, पोहवा सुदर्शन वानोळे, वासुदेव नारनवरे, पोना / सुनील खंडागळे, सुधीर पांडे, अविनाश बानकर, शेख इकबाल, दीपक वाड्रसवार, अमित पोयाम, पंकज उंबरकर, नीरज खिरटकर, संतोष आढाव, विजय राठोड यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share