WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

किडझी प्ले स्कुल येथे बालक दिन साजरा...,

Image

वणी :-

आज दिनांक 14 नोव्हेंबर 2019 रोजी किडझी प्ले स्कुल मध्ये बालकदिन साजरा करण्यात आला.

या दिवसाचे औचित्य साधून पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनातील बालमनावर घर निर्माण करेल अश्या रोचक गोष्टी मुलांना सांगण्यात आल्या, तसेच मुलांना व्यावहारिक ज्ञान यावे याकरिता पैसे व रुपये याबद्धल प्रत्यक्ष जुने व नवीन नाणे आणि रुपये दाखवून त्याबद्दल माहिती देण्यात आली. तसेच संगीत खुर्ची हा खेळ खेळून मुलांनी बालकदिन उत्साहात साजरा केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याधापक प्रवीण सातपुते यांच्या मार्गदर्शनात शिक्षिका आरती सातपूते, मंदाकिनी भिंगारे, अपर्णा बडवाईक, शीतल निंबाळकर, निशिगंधा कोटावर यांनी पुढाकार घेतला.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले