WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

सिव्हिल ड्रेस वर होमगार्डची दुचाकी स्वारांकडून वसुली....

Image

आ. बोदकुरवारांनी सुनावली खडाजंगी :- मग मोठ्या नियमबाह्य वाहनांना आशीर्वाद कुणाचा?

- प्रतिनिधी सुरज चाटे :-

वणीतील प्रसिद्ध टिळक चौक पोस्ट ऑफिस परिसरात नेहमीच दुचाकीस्वारावर कारवाई होताना सर्वांच्या निदर्शनास येत असतात मात्र आता चक्क अवैध पने वसुली करीत होमगार्ड सुद्धा दुचाकी स्वरांना दम देताना दिसत आहे, विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारच्या मान्यता प्राप्त पोशाखात होमगार्ड व वाहतूक पोलीस सुद्धा नसून चक्क वसूली सिव्हिल ड्रेस वर सुरू असल्याने काही परिसरातील जनतेनी सदर बाब आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या निदर्शनात आणून दिल्याने आमदार मोहोदयानि सदर वाहतूक विभाग व होमगार्डला चांगलीच कान फोडणी दिली.

सदर होमगार्डला वसुलीचा अधिकार आहे काय? हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात घर करीत असून सुद्धा सिव्हिल ड्रेस चा होमगार्ड व वाहतूक पोलीस कायद्याला केराची टोपली दाखवत असल्याचे निदर्शनास येत आहे, तर दुसरीकडे वाहतूक विभाग यावर पांघरून टाकण्याचे कार्य सुद्धा करीत आहे, मग हा सारा प्रकार योग्य आहे काय? तरी या बाबीकडे तातडीने वाहतूक विभागाच्या वरीष्ठ स्थरावरून सुद्धा यांवर लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share