WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शेतातील कापुस गंजीला आग, शेतकर्‍यांवर आर्थिक संकट

Image

पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल...!!

-शहर प्रतिनिधी

मारेगाव- तालुक्यातील सिंधी येथील एका शेतकऱ्यांच्या शेतातील गोळा केलेल्या कापुस गंजीला येथीलच काही लोकांनी आग लावुन नुकसान केल्याची तक्रार ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. मारेगाव तालुक्यातील सिंधी येथील देविदास नानाजी डाऊले (45) या शेतकऱ्याच्या शेतात येथीलच नारायण बलकी (52), ज्ञानेश्वर बलकी (47) प्रफुल बलकी (25) या तीन जणांनी आग लावली अशी तक्रार मारेगाव पोलिसात दाखल करण्यात आली आहे.

या आगीत तीन ते चार क्विंटल कापुस जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना 12 डिसेंबर रोजी रात्री दरम्यान घडली असून सदर घटनेचा मारेगाव पोलिस ठाण्यात या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.मारेगाव तालुक्यातील सिंधी येथील देविदास नानाजी डाऊले यांच्या शेतात कापुस गोळा करण्याचे काम सुरू असून रात्री त्यांच्या शेतात गोळा करण्यात आलेल्या कापसाला महागाव येथील नारायन बलकी, ज्ञानेश्वर बलकी आणि प्रफुल्ल बलकी यांनी आग लागली असल्या बाबतची तक्रार दाखल करण्यात आली असुन डाहुले यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध 435, 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले