WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

महिलांवरील व लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस मोठ्याप्रमाणात घडत असल्यामुळे महिलांनी कोनत्या पुरुषांवर कसा ‘भरवसा’ करायचा?असा प्रश्न या घटनेच्या निमीत्याने निर्माण झाला आहे.

Image

यवतमाळ:आठ दिवसापुर्वी वणी शहरानजीक असलेल्या गणेशपुर येथे एका व्रुद्घाने घराशेजारीलच एका सहा वर्षिय चिमुकलीवर अतिप्रसंग केल्याची घटना घडली आहे.तर दोन दिवसापुर्वी मंगळवारी वणी येथे एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा त्याच महाविद्यालयातील एका उप प्राचार्याने अश्लिल छळ करुन विनयभंग केल्याची घटना घडली आहेत.याबाबत सदर विद्यार्थिनीच्या तक्रारीवरुन त्या उप प्राचार्यावर गुन्हा दाखल झाला असुन आरोपि अजुनही फरार आहेत.तर या घटनेची शाही वाळते न वाळते आज दि.19 डिसेंबरला मारेगाव येथे एका महाविद्यालयात एका विद्यार्थीनीचा विनयभंग तर दुसर्या घटनेत एका विवाहीत महिलेवर बळजबरी करुन बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहेत.

या दोन घटनांमुळे मारेगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.विशेष म्हणजे या घटनेत ओळखिच्याच ईसमाकडुन बलात्कार व विनभंग या सारख्या घटना घडत असल्यामुळे महिलांनी व मुलींनी कोनत्या पुरुषांवर विश्वास ठेवायचा असा प्रश्न निर्माण होतो आहे.

मारेगाव तालुक्यातील मांगरुळ येथिल एका ईसमाने गावातीलच एका महीलेला मारेगाव येथिल बदकी भवन समोरुन वणी- वरोरा मार्गाने नेवुन तीच्यावर बळजबरीने बलात्कार केला.हि घटना दि.18 डिसेंबरला बुधवारी दु.2 ते 4 वाजताचे दरम्यान घडली आहे.या घटनेची माहीती मिळताच तिच्या पतीने आज दि.19 डिसेंबरला गुरुवारी मारेगाव पोलीस स्टेशन गाठुन तक्रार दाखल केली.या तक्रारीवरुन पोलीसांनी भादंवी 363,376,(1)नुसार गुन्हा दाखल केला असुन आरोपि गणेश धनराज भोयर(24) याला अटक करण्यात आली आहे.तर दुसर्या घटनेत मारेगाव येथिल मारेगाव- वणी मार्गावरील एका कला वाणीज्य महाविद्यालयात शिक्षण घेणार्या एका विद्यार्थिनीचा विनयभंग तेथिलच एका लँब असिस्टंनेच केला आहे.

किशोर अंबादास पिंगे(36)रा.मार्डी असे त्या आरोपिचे नाव असुन त्याचे विरोधात तक्रार दाखल केली अाहे.या तक्रारीवरुन मारेगाव पोलीसांनी भादंवी 354(अ)(5)नुसार गुन्हा दाखल करुन आरोपिला तात्काळ अटक करण्यात आली आहे.पुढिल तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक यांचे मार्गदर्शनात पोउनि अमोल चौधरी करित आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले