WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

नायगाव येथे दिवसा शेतात वाघाचे दर्शन..... वरोरा रोड वर नागरिकांची गर्दी

Image

प्रतिनिधी सागर मुने, वणी

वाघाचे दर्शन होणे हे प्रत्येकाच्या भाग्यात नसते, पण शुक्रवारी वरोरा रोडवरील नायगावला जाणाऱ्या रस्त्या समोरील शेतात वाघ बसून असल्याचं कापूस वेचणाऱ्याना दिसला. त्यामुळे ते सर्व गावात परतले, तेथून जाणाऱ्या लोकांनी प्रत्यक्ष पट्टेदार वाघ पाहल्याने वाघ पाहून खरंच खूप भीती वाटते अस प्रत्यक्ष दर्शी योगिता बोबडे व श्रद्धा वासाडे यांनी सांगितले. सकाळी 10 वाजता वाघ दिसला, आम्ही त्याच्या दूर असलो तरी पण खूप घाबरलो होतो. दुरुनच पाहून अंगावर काटे उभे झाले, मनात वेगळे विचार यायला लागले, समोर आल्यावर साक्षात यमाचे दर्शन होते. ज्या लोकांचा वाघाने फडशा पडला त्यांना कस वाटलं असेल, अस त्यांनी मत व्यक्त केलं.

आपल्या परिसर मोठ्या प्रमाणात जंगलाने व्यापला असून रोही, रानडुक्कर या प्राण्यांनी भरला आहे. सध्या वणी परिसरात 3 वाघ असल्याची चर्चा आहे. टिपेश्वर जंगल सोडून वणी परिसरात रानडुक्कर व रोही याची शिकार त्याला करता येते, पण पाळीव प्राणी व माणसावर सुध्दा हल्ले होतात . त्यामुळे आता वणी परिसरातील नागरिकांन मध्ये वाघाची दहशत पसरल्याने सगळी कडे भीतीचे वातावरण झाले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना प्रश्न पडला शेतात व रात्री घरी जाताना वाघ तर हल्ला करणार नाही. वडगाव, भुरकी, रांगणा, नांदेपेरा, मच्छीन्द्रा भागातील नागरिकांना सतर्क राहणे आवश्यक आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share