WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

यवतमाळ येथे भीषण अपघात दोन जण जागीच ठार,तर ईतर गंभीर अवस्थेत उपचारासाठी रवाना

Image

प्रतिनिधी: रोहन रा आदेवार

यवतमाळ-: दि.२८ डिसेंबर सायंकाळीे ५:३० येथील भोसा-नागपुर बायपास वर वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने भिषण अपघात झाला.एम.एच.३२-एएच -३७७७ या गाडीचा वाहन चालकांचा गाडी वरील नियंत्रण सुटल्याने भिषण अपघात झाला.त्या वाहनाचा वेग ईतका भरधाव होता कि,त्यातील एक जण वाहनाच्या बाहेर जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलावर अडकला.अपघातामध्ये दोन जण जागीच ठार झाले असुन ईतर प्रवाश्यांना यवतमाळ येथील शासकिय वैद्यकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असुन ते गंभीर असल्याची माहिती आहे.

एम.एच.३२-एएच-३७७७ हे वाहन यवतमाळ वरून वर्धा येथे जात असताना हा अपघात झाला. या वाहनातील मुले क्रिकेट खेळून आले असे दिसून येते. त्या वाहनात बक्षीस व क्रिकेटचे सामान आढळून आले. मुले वर्धेचे असून बाकी मुलांना सरकारी रुग्णालय यवतमाळ येथे उपचारासाठी नेण्यात आले.

जेथे अपघात झाला त्या ठिकाणी पाहून अंगावर शहारे येईल इतकी भयावह परिस्थिती होती, यवतमाळ येथे निस्वार्थ पणे निरंतर समाज सेवा कार्य करणारे दोन व्यक्ती विनोद दोंदल व संदिप शिंदे त्या रस्त्याने एका म्हातार्‍या आजीला मदत म्हणून गादी ,चादर, ब्लेंकेट व इतर साहित्य घेऊन जात असताना यांना हा अपघात दिसला लगेच लगबगीने आपली गाडी थांबवली व तिथे घडलेली घटना बघितली एक लहान मुलगा साधारण बारा तेरा वर्षाचा अपघातात मृत पडलेला दिसला,रोडने येणारे जाणारे बघ्याची भूमिका घेत होती, व त्या मृत मुलाचे फोटोसेशन करता होते, त्या मृत मुलाच्या अंगावर त्याच्या जवळ असलेली चादर त्या मृत लहान मुलाच्या अंगावर टाकली व लगेच पोलिस स्टेशनला कळवीले, खरच कोणालाही कोणाचे घेणेदेणे नसते, माणूस माणसाच्या मदतीला नाही आला तर त्याचे माणूस होऊन काही कामाचा नाही, मानूस हा पान्याचा बूडबूडा आहे, कधी जीवनात काय होईल सांगता येत नाही, हे ध्यानात ठेवा.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share