WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराचे आयोजन

Image

प्रतिनिधी: रोहण राजु आदेवार,

वणी: तालुक्यातील पेटूर गावात लोकमान्य टिळक महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेचे पेटूर या गावात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना शिबिराची सुरुवात सोमवार ला झाली. शिबिराचे उद्घाटनसोहळा आज दि.30,12,2019 वार सोमवार 2.30 ते 5.00 दरम्यान सोहळा पार पडला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नरेंद्रजी नगरवाला (अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ वणी) हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शि.प्र.मं वणी चे उपाध्यक्ष श्री.रमेशराव अणे, श्री.लक्ष्मण भेदी सचिव शि.प्र.मं वणी, श्री.अशोक सोनटक्के सहसचिव शि.प्र.मं वणी, श्री.उमाकांत कुचनकर, श्री.अशोक जयस्वाल, श्री. डॉ. प्रसाद खानझोडे कार्यकारी प्राचार्य लो.टि.महा. वणी. सौ.विमालताई झाडे सरपंच पेटूर, सौ. मंगलाताई ढेंगळे उपसरपंच पेटूर, कु.वडवाले सचिव पेटूर, श्री.विजय पीपराडे मुख्याध्यापक, श्री. नथूजी झाडे मंचावर उपस्थित होते.

महात्मा गांधींचा ‘खेड्याकडे चला’ हा विचार घेऊन गावांमध्ये विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरांमार्फत निर्मलग्राम, सर्वांगीण व शाश्वत ग्रामविकास, चर खोदणे, रस्ते बांधणी, पाणी अडवा पाणी जिरवा, वृक्षारोपण, रक्तदान आदी कार्य श्रमदान, पथनाट्य, रॅली, उद््बोधक चर्चा, शिवारफेरी, गावकरी संवाद या माध्यमांतून समाजाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात युवाशक्ती वा ऊर्जास्त्रोत पुरविण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजना करनार आहे.

विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा या साठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व घडविण्याचे कार्य शिक्षण क्षेत्राद्वारे होत असताना दिसत आहे. प्रभावी व्यक्तिमत्त्व घडवत असताना तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाण व सेवाभाव निर्माण करण्याचे कार्य महाविद्यालयीन स्तरावर राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाद्वारे होत आहे. तरुणांमध्ये समाजसेवेची जाण झाल्यानंतर त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे राष्ट्रसेवा होय. राष्ट्रीय सेवा योजना ही संकल्पना सांगताना त्यात सेवा आणि त्याग हे शब्द युवकांच्या आयुष्यातील सेवेचे महत्त्व विशद करतात. विशेषत: शिक्षण क्षेत्रातून सेवासंस्कार तरुणांवर व्हावा, तरुणांकडून राष्ट्रसेवा घडावी, युवाशक्तीचा उपयोग राष्ट्राला व्हावा, या हेतूने शिक्षण क्षेत्रात विविध योजना वेगवेगळ्या स्तरावर राबविल्या जातात. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश माघाडे यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.डॉ. निलिमा दवणे म्याडम यांनी केले

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share