WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वर्दळीच्या वाटेत जीवघेणा खडा, आतापर्यंत 5 ते 7 गाड्या गेल्या गड्यात

ImageImage

- अमोल कुमरे

खड्याचा इतिहास फार नवीन नाही आणि खड्यात अनेकांना जीव गमवावा लागला हे नवीन नाही, म्हणता येत नाही. किती आंधळेपणाचे ढोंग करत प्रशासन त्याच ताज उदाहरणं बरीच आहे. 'उद्याच लग्न आणि आजच वाटेत एका नवं वधूला जीव गमवावा' लागला ही बातमी आपण वाचलीस असेल. याला जबाबदार कोण? खडा की, खड्याचा मालक? हे जीवघेणा खड्डे कधी दुरुस्त होतील? कुणास ठाऊक.

असाच जीवघेणा खड्डा वणी शहरातील लोकमान्य महाविद्यालयाच्या समोर अगदी अपोझिट सपना टायपिंगकडे जाताना रस्त्याच्या बाजूला एक मोठा भगदाड पडलं आहे. याचा आतापर्यंतचा इतिहास असा की, 5 ते 7 चारचाकी गाड्या या खड्यात आदळल्या. सुदैवाने या खड्याने जीव घेतला नाही पण आर्थिक नुकसान मात्र, गाड्याचे नक्कीच झाले. एकदिवस हा जीवघेणा खड्डा 'जीवघेतं' म्हणून नक्कीच ओळखला जाईल यात तीळ मात्र शंका नाही. प्रशासन वाट बघत आहे की काय? खळबळ जनक घटनेची असा सवाल नागरीकातून बोलला जात आहे.

या परिसरात देवदर्शनाला बरीच भक्ताची तुंबळ असते. त्यातच शिक्षण संस्था असल्याने तरुणाईची बाईकड्राईव्हही स्टाईलिश असते आणि बाजारवाडीत येणारी ग्रामीण, शहरी मंडळी असा लवाजमा या मार्गाने रोज असतो. नुकताच या खड्याचा एका कार मालकाला नाहकत्रास सहन करावा लागला. आणि आणखी किती लोकांना असा नाहक त्रास सहन करावा लागेल. कोण जाणे? पण नागरिक जाणतात की प्रशासनाचे हे काम आहे. या खड्याला त्वरित इतिहासजमा करावा अशी जनतेची मागणी आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share