WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पोलीस स्थापना दिनानिमित्त मारेगांव शहरासह तालुक्यातील 'रायझिंग डे' सप्ताह*

Image

- सचीन मेश्राम मारेगांव ...

2 जानेवारी हा पोलीस स्थापना दिवस म्हणून सर्वत्र मानला जातो त्यानिमित्ताने मारेगांव शहरांमध्ये 2 जानेवारी ते 8 जानेवारी यादरम्यान पोलीसदला मार्फत रायझिंग डे सप्ताह म्हणून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या सप्ताहामध्ये पोलीस दला मार्फत शहरातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना फायरिंग ची माहिती तसेच पोलीस गण चे प्रशिक्षण चे धडे घेण्यात आले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना पोलीस व पोलीस स्टेशनच्या दैनंदिन कामकाज कसे चालते याचाही मारेगांव पोलीस दला मार्फत माहिती देण्यात आली. तसेच शहरातील प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना काही तक्रार असल्यास ज्या त्या शाळेमध्ये स्वतंत्र तक्रार पेटी ही लावण्यात आली या सप्ताह नंतर मारेगांव शहरांमधून पोलीस दला मार्फत एक जनजागृती रॅली ही काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमाने सर्व जनतेला सामाजिक एकता व शांतता राखावी असा संदेशही देण्यात आला. तसेच पोलीस दला मार्फत घेण्यात आलेल्या रायझिंग डे सप्ताह च्या बाबतीत सर्व मारेगांव शहरवासीया कडून कौतुक ही होताना दिसून येत आहे. या सप्ताहसाठीमारेगांव पोलिस स्टेशन चे ठाणेदार जगदीश मंडळवार यांच्या मार्गदर्शनाखाली खुपिया दलाचे कॉन्स्टेबल राहुल औंम्बे तसेच सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनीही आपले योगदान दिले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले