WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भेदोडकर यांच्या काव्यसंग्रहांचे प्रकाशन ....

Image

सागर मुने ,वणी

कवि प्रा. गुलाब भेदोडकर यांच्या ' उषःकाल ' व 'सांगाती ' या काव्यसंग्रहांचे प्रकाशन ज्येष्ठ संपादक श्रीपाद अपराजित , नागपूर यांच्या हस्ते दि. 14 जानेवारी रोजी सायं 7 वाजता जैताई मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे आयोजन विदर्भ साहित्य संघाची वणी शाखा व भेदोडकर परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार सदाशिवराव ठाकरे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार , डाॅ. अरविंद भुरे आणि नरेंद्र नगरवाला उपस्थित राहणार आहेत.

विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड आणि डाॅ. दिलीप अलोणे काव्यसंग्रहांवर भाष्य करणार आहेत. प्रकाशन समारंभाच्या दिवशी काव्यसंग्रह साहित्यप्रेमींना सवलतीच्या दरात मिळू शकतील.साहित्यप्रेमींनी समारंभाला उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांनी केली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले