WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

महाराष्ट्र बंद ला वणीत विरोध...पोलीस संरक्षणात प्रतिष्ठाने सुरू.....

Image

सागर मुने, वणी

नागरीकता संशोधन कायद्याच्या निमीत्ताने पहिल्यांदाच महाराष्टा्सह भारत देशात मोर्चाच्या विरोधात मोर्चा असे चिञ पहायला मिळत आहे. महाराष्टा्चे मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांनी अगोदरच हा कायदा महाराष्टा्त लागु होणार नाही असे सांगीतले. तरी सुध्दा या कायद्याच्या विरोधात आंदोलने सुरुच आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कायद्याच्या विरोधात आज दि.24 जानेवारीला महाराष्ट् बंद चे आवाहन केले होते.

या बंद ला समर्थन म्हणुन वणी येथिल वंचीत बहुजन आघाडी,मुस्लिम संघर्ष समिती,भारतीय मुस्लिम परिषद,बारतीय बौद्ध महासंघ,राष्टवादी काँग्रेस पार्टी, भारतीय काँग्रेस पार्टी,समाजवादी पार्टी,बहुजन समाज पार्टी,भाकप,माकप,मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड,धनगर समाज संघर्ष समिती,ओबीसी महासंघ,जिजाऊ ब्रिगेड,संविधान हक्क परिषद,ईत्यादीसह एकुन 36 संघटना या बंद साठी एकवटल्या होत्या.तसेच आज सकाळी 10:30 वाजताचे दरम्यान या संघटनेचे काही पदाधिकारी वणी शहरात फिरुन व्यापार्यांना त्यांचे प्रतिष्ठाने बंद ठेवण्याची विनंती करत होते, पण या बंदला धुडकावुन लावले.

वणीतील व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाने सुरु ठेवण्यासाठी

व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राकेश खुराणा,अनिल आक्केवार,वैभव खडसे,प्रविण पांडे,भगवान मेहता,महेश मेहता,दिपक चौधरी,उदय जोबनपुञा,प्रशांत गुंडावार,अनुराग काठेड,विक्रांत सुञावे,अचल जोबनपुञा,संजय पांडे,अजय मुनोत,विजय पांडे,भुषन भेदी,उज्वल पांडे ईत्यादीसह व्यापार्यांनी उपविभागीय अधिकारी वणी तसेच ठाणेदार पोलीस स्टेशन वणी यांना निवेदणाद्वारे पोलीस बंदोबस्त मागीतला होता.

विविध संघटनांनी दुपारी 3 वाजता शासकीय मैदानावरुन रॅली काढण्यात आली होती व शहरातील मुख्य चौकातून रॅली शिवाजी चौक येथे रँली समाप्त करण्यात आले. यावेळी विविध संघटनेच्या नेत्यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. त्यानंतर वणीचे एसडीओ जावळे यांच्या मार्फत राष्टपती,पंतप्रधान व ग्रुहमंञी यांना निवेदन दिले. साधारण मोर्चात तिन हजाराच्या जवळपास नागरीक सहभागी झाले होते. तसेच कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share