WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीचा विज्ञान प्रयोग राज्यस्तरावर...

Image

सागर मुने,वणी

तालुक्यातील अनु.जाती.मुलांची शासकीय निवासी शाळा परसोडा वणी येथिल प्रयोगशाळा साहाय्यक विलास किसनराव जाधव यांच्या विज्ञान प्रतिकृतीची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली. महात्मा फुले विद्यालय ऊमरखेड येथे पार पडलेल्या ४५ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात एकुन १०१ प्रतिकृती मांडण्यात आल्या होत्या . या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री.विलास जाधव यांच्या प्रतिकृतीला प्रयोगशाळा सहाय्यक गटातुन प्रथम क्रमांक मिळाला त्यांनी आपली सूर्यमाला या विषयावर प्रतिकृती सादर केली होती या प्रतिकृतीची ४५ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली या प्रतिकृतीतुन सूर्यग्रहन ,चंद्रग्रहन,ग्रहाबद्दल सविस्तर माहिती ,ऊपग्रह या विषयाची सविस्तर मांडणी केली होती. विलास जाधव यांच्या प्रतिकृतीची राज्यस्तरावर निवड होण्याची ही पाचवी वेळ आहे . यांची राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका एल.एस.दांडेकर श्री.दत्ताञय पुलेनवार सहा.शिक्षक, श्री.वैभवजी दहिकर कनिष्ठ लिपीक, श्री.विजयजी बहादुरे अधिक्षक,श्रीमती राजश्री पेंदाम अधिक्षक,श्री.पी.के.लेदाडे सहा.शिक्षक .श्री.ठमके सर सहा.शिक्षक श्री.प्रधान शिपाई ईत्यादीने अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . विलास जाधव यांनी आतापर्यंत 1)फवारणी यञ- 2015

2)HIV AIDS- 2016

3)किटकनाषक फवारणी विषबाधा -2017

4)स्वच्छता आणि आरोग्य -2018

5) आपली सूर्यमाला -2019 अशा प्रतिकृती तयार केल्या होत्या व त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share