WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

चिमुकल्यांचे हसत खेळत स्नेहसंमेलन .... किडझी प्ले स्कूल चा उत्तम उपक्रम....

Image

सागर मुने,वणी

किडझी प्ले स्कुल ही झी लर्न लिमिटेड ची फ्रेंचाईजी असून भारत आणि नेपाळ मध्ये 2000 पेक्षा जास्त शाखा असून संपूर्ण शिक्षण ऍक्टिव्हिटी बेस्ड असून मुलांचे शारीरिक, बौद्धिक विकास कसा करता येईल यावर अधिक भर दिला आहे. संपूर्ण अभ्यासक्रम हा हसत खेळत शिकत असतांना न कळत मुले इथे घडतात, हीच खरी किडझी ची जमेची बाजू आहे.

दि1 फेब्रुवारी 2020 रोजी वणी येथील शाखेचा स्नेहसम्मेलन सम्पन्न झाला.कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्करराव ढवस, संचालक वसंत जिंनिंग अँड प्रेसींग, वणी तर मुख्य अतिथी म्हणून सुधीर दामले संचालक रंगनाथ पत संस्था, वणी. तसेच किडझी विदर्भ विभागाचे चे एरिया मॅनेजर स्वप्नील गजभिये उपस्थित होते.

सर्व विद्यर्थ्यांनी भाग नोंदवून अतिशय सुंदर असा कार्यक्रम प्रस्तुत केला की सर्व मान्यवर व उपस्थित पालक वर्गाने सर्वांचे कौतुक केले.. प्ले ग्रुप, नर्सरी, ज्यु. केजी, सी. केजी च्या विद्यार्थ्यांनी सुंदरनृत्य सादर केली तर, सी . केजी च्या विद्यार्थ्यांनी सुंदर नाटिका सादर केली. तसेच रुही अग्रवाल, पवनी एकरे, रिधिमा गुप्ता, आरना बांगडे, अदिबा बुऱ्हाणी यांनी एकल नृत्य सादर केली. 2019-20 या वर्षात घेतल्या गेलेल्या आठ स्पर्धेतील विजेत्यांना स्मृती चिन्ह व सन्मान पत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अनेक व्यक्तींचे पाठबळ आमच्या पाठीशी होते त्यात प्रामुख्याने दिलीप सातपुते, शेखर सातपुते, अरुण लाकडे, नंदा लाकडे संपूर्ण किडझी प्ले स्कुल च्या शिक्षिका मंदाकिनी भिंगारे, शीतल निंबाळकर, निशिगंधा कावटवार व शिक्षकेत्तर कर्मचारी हेमा काकू, लता काकू यांचे विशेष योगदान आहे. मुख्यध्यापक प्रवीण सातपुते यांनी संपूर्ण कार्यक्रमाची यशस्वी गाथा बघतांना आनंद व्यक्त करीत मुलांचे कौतुक केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share