WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अवघे हिंगणघाटकर उतरले रस्त्यावर, नागरिकात संतापाची लाट, आरोपीला फाशीच द्या

Image

•जशास तसें, आरोपीला जाळून टाका, न्याय द्या पीडितेला..!!

शिक्षण संस्थेमध्ये तासिकांवर काम करणारी पीडित तरुणीला न्याय मिळावा, यासाठी अवघे हिंगणघाटकर आणि आजूबाजूची समस्त जनता उतरली रस्त्यावर. या घटनेचा तीव्र निषेध करून शंभर टक्के बंद पुकारून आरोपीला फाशीची मागणी येथील जनतेनी केली. प्राध्यापिका चाळीस टक्के जळली असून तिची प्रकृती अतिशय आजही गंभीर आहे.

एकतर्फी प्रेमातून ही अमानुष घटना एका तरुणाने घडवून आणली. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आज शहरात संपूर्ण बंद पाळला गेला. यात बाल, वृद्ध, विद्यार्थी, विद्यार्थींनी, व्यापारी, कर्मचारी, डॉक्टर, वकील, कामगार हे बहुसंख्य सामील झाली होती. आरोपीला जाळून टाका असे फलक या मोर्चात दिसून आले. त्याच बरोबर सोशल माध्यमातून या घटनेचा तीव्र निषेध नेटकरी करत आहेत. ज्या ठिकाणी ही दुर्दैव घटना घडली. इथूनच हिंगणघाटकरानी मोर्चा काढून तो उपविभागीय कार्यालय येथे जाऊन निवेदन देण्यात आले असे सूत्रांनी सांगितले. यावेळी नागरिकात संतापाची लाट पसरली असून जनआक्रोश फाशीची मागणी करू लागला आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share