WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पोलीस पाटील संघटना झरी-जामणीयाच्या मार्फत तहसील कार्यालयामार्फत H.D.O. यांना निवेदन

Image

•गावातील पोलीस पाटील याचा मनात दुविधा..

प्रतिनिधी/ सचिन मेश्राम

झरी/जामणी- पोलीस पाटील संघटना झरी (जामणी) याच्या मार्फत तहसील कार्यालयामार्फत H.D.O. उपविभागीय कार्यालय केळापूर यांना निवेदन सादर करण्यात आले की , पोलीस पाटील अधिनियम १९६७ ला पोलीस पाटलाची नियुक्ती करण्यात आली आहे.सदर अधिनियान्वये कोणतेही दाखले देण्याचा अधिकार नाही .परंतु महसूल दफ्तरी नोंद घेण्याकरिता पोलीस पाटलाचा दाखला घेऊन येण्यास नागरिकांना सांगतात त्यानुसार पोलीस पाटील यांना नागरिकांना सातबारा वारस चाढवण्याकरिता वारस दाखला, श्रावण बाळ योजना, संजय गांधी योजना, हयात प्रमाणपत्र, गाव बदली प्रमाणपत्र ई. नाना प्रकारचे दाखले द्यावे लागतात. दाखले न दिल्यास पोलीस पाटील याची तक्रार दिली जाते. तक्रारीवरून निलंबनाची कार्यवाही वरिष्ठ अधिकारी करतात. अशीच घटना ऐका पोलीस पाटला सोबत घडली आहे. वृत्तपत्रातील बातमी २२/१/२० ला. श्री .सुरेद्र भीमराव शेळके, राहानार लोहरा, तालुका पाचोरा, जिल्हा वाशिम या पोलीस पाटील ला निलंबित केल्या गेले आहे. यावरून पोलीस पाटील याचा मनात दुविधा स्तीती निर्माण झाली आहे .त्यामुळे दाखले पोलीस पटीलानी दाखले द्यावे का नाही असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश पारित करावा. याबाबत तहसिल कार्यालयामार्फत उपविभागीय अधीकारी केळापूर यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी पोलीस पाटिल संघटनेचे श्री.धवणे पाटील, प्रकाश गेडाम पाटील, कोरांगे पाटील, मेश्राम पाटील, टेकाम, मडावी, गंडतवार पाटील इत्यादी पोलीस पाटील उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले