WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

हिंगणघाट येथील घटनेच्या निषेधाचे मारेगावात पडसाद, पत्रकारांतर्फे पोलीस निरीक्षक श्री. जगदीश मंडलवार यांना दिले निवेदन

Image

हिंगणघाट येथील घटनेच्या निषेधाचे मारेगावात पडसाद, पत्रकारांतर्फे पोलीस निप्रतिनिधी/ सचिन मेश्राम (मारेगाव)

हिंगणघाट येथे नुकतीच एका प्राध्यापक युवतीला एका माथेफिरू युवकाने पेट्रोल टाकून भर चौकात पेटविले. ती युवती नागपूर येथे मृत्यूशी झुंज देत आहे. अशा माथेफिरुला फाशीची शिक्षा त्वरित ठोठावण्यात यावी अशी मागणी मारेगाव येथील पत्रकार बांधवांतर्फे करण्यात आली. समाजामध्ये सध्या मानवी विकृती बळावलेली आहे. अशातच अनेक युवक हे वेगवेगळ्या व्यसनांना बळी पडत आहेत. हिंगणघाट येथील घटना ही सभ्य संस्कृती व समाजाला काळिमा फासणारी आहे. अशा घटनांना आळा घालण्याचा प्रयत्न करावा व या नराधमाला तात्काळ फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन मारेगाव येथील पोलीस निरीक्षक श्री. जगदीश मंडलवार याना दिले. यावेळी मोरेश्वर ठाकरे , सुमित हेपट, अनंत गोवर्धन, भास्कर राऊत, सचिन काकडे , सचिन मेश्राम , पंकज नेहारे उपस्थित होते.रीक्षक श्री. जगदीश मंडलवार यांना दिले निवेदन

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले