WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीचे नगरसेवक पी.के.टोंगे यांचा अपघात..... उपचारार्थ नागपूर येथील रुग्णालयात दाखल...

Image

प्रतिनिधी सुरज चाटे वणी :-

वणीच्या नगरपरिषदेचे नगरसेवक पी के टोंगे यांच्या सह त्यांचे सहकारी जयंता वासेकर यांचा दिनांक 6 ला दुपारच्या दरम्यान अपघात झाल्याची घटना घडली असून त्यांना पुढील उपचाराकरिता नागपूर येथील आरेयर्स हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.

वणी तालुक्यातील नगरपरिषदेचे नगरसेवक पी. के. टोंगे यांचा दिनांक 6 ला दुपारच्या दरम्यान लालगुडा परिसरा लगत येणाऱ्या डीलक्स बार नजीक दुचाकी क्रमांक एम एच 29 ए झेड 2515 ने रस्त्यावर वळण घेताना भरधाव वेगात येणारी i-20 MH 34, AM7389 ने टोंगे हे बसून असलेल्या दुचाकीला धडक दिली त्यात दुचाकीवर असलेले टोंगे व जयंता वासेकर यांना गंभीर इजा झाली असून त्यांना तात्काळ उचरासाठी दाखल करण्यात आले. परंतु मार गंभीर स्वरूपाचा असल्याने पी के टोंगे यांना नागपूर येथील आरेयर्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत तर सहकारी वासेकर याना वणीत उपचार करून सुट्टी देण्यात आली. तसेच चारचाकी वाहनास पोलिसानी आपल्या ताब्यात घेतले असून वाहनधारक नेमके कुठले आहे हे मात्र वृत्त लिहेपर्यंत स्पष्ट झाले नाही.

पी के टोंगे यांच्या पायाला गंभीर इजा झाल्याने त्यांना डॉक्टरांनी ऑपेशन संगीतल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे, अपघाताचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले