WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

आज मृत्यूशी झुंज संपली, जळीतकांड प्रकरणातील पीडितेने अखेरचा स्वास घेतला.

ImageImage

अखेर हिंगणघाट जळीत कांड प्रकरणातील प्राध्यापिका तरुणीने सकाळी ६:५५ ला घेतला अखेरचा श्वास

दरम्यान आज पहाटे चार वाजता पिडीतेला हृदयविकाराचा झटका येवुन डाॅक्टरांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नाला अपयश आले.गेल्या सात दिवसापासून मृत्यूशी झुंज दिली. मात्र ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये तिची प्राणज्योत मालवली.

तीला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी अतोनात प्रयत्न केले. पण त्यांना फारसे यश आले नाही. पीडितेच्या त्वचेला इजा झाली त्यामध्ये जंतूसंसर्ग वाढला आणि आज सकाळी सहा वाजून पंचावन मिनिटांनी अखेर स्वास घेतला. या प्रकरणातील आरोपीला नागपूर जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले होते.

गेल्या सोमवारी हिंगणघाटमध्ये एका प्राध्यापक तरुणीला पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याची घटना घडली. नंदोरी चौकातील एका किराणा दुकाना समोर ही धक्कादायक प्रकार घडला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. पीडितेसाठी संपूर्ण परिसरातून प्रार्थना केल्या जात होत्या. डॉक्टर तिचा जीव वाचवण्यासाठी हर तऱ्हाचे प्रयत्न करत होते. मात्र तिची प्रकृती भरतीकेले तेव्हापासून गंभीर होती. सात तारखेपासून तीला स्वास घेण्यास त्रास होत लागल्याने पीडितेला व्हेंटिलेटर ठेवण्यात आले आले होते. आज तिची मृत्यूशी झुंज संपली आणि सकाळी तिची प्राणज्योत मालवली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले