WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

माथार्जुन जि. प. शिक्षकाचा मनमानी कारभार चव्हाट्यावर,...
शिक्षण विभाग दखल घेणार का ? -
गैरहजर राहूनही हजेरी पटावर सह्या मारण्याचा प्रकार...

Image

श्री.एन व्ही.जावळकर (पद शिक्षक) हजेरी रजिस्टरवर खोड-खाड करण्याचा प्रयत्न...!!

वर्ग न घेता शालेय आवारात नुसता फिरतो, आपल्या जवळच्या विद्यार्थ्यांना शिकवतो..!!

प्रतिनिधी/ योगेश मडावी (झरी जामणी)

गेल्या काही दिवसापासून जि.प. शाळा, माथार्जुन येथील शिक्षकाने गैरहजर राहण्याचा सपाटा लावला आहे. एन व्ही जावळकर असे शिक्षकाचे नाव असून तो शाळेत मनमानी करतो असे येथील मुख्यध्यापकाची तक्रार आहे. बऱ्याच तक्रारी या शिक्षकाच्या आहे असे स्थानिक सांगतात. मर्जीच्या विद्यार्थ्यांना शिकवणे, शालेय पटांगणात वर्ग न घेता फिरत राहणे, पदवीधर शिक्षक या हुद्द्यावर असून मी फक्त वर्ग १ ली लाच अध्यापन करणार अशी धमक्या देतात. एक ना अनेक कारण सांगत वेळेच्या आधीच शाळेतून बाहेर जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होत आहे.

हा शिक्षक इथेच आता थांबला नाहीत तर त्याने हजेरी रजिस्टर वर खोड-खाड पणा केल्याने सदर तक्रार मला शिक्षण अधिकाऱ्याकडे करावी लागली असे मुख्यध्यापक म्हणाले, दिनांक ०५-०२-२०२० ते ०९-०२-२०२० पर्यंत अनधिकृत जावळकर गैरहजर होते. रजिस्टरमध्ये रीतसर लालपेनेने गैरहजर अशी खतावणी केली असून सुद्धा ते १०-०२-२०२० ला शाळेत आले आणि माझ्या समक्ष वरील तारखांच्या रकाण्यात ‘गैरहजेरी’ लिहून असल्यानंतर हि सकाळच्या शाळेची वेळ टाकून सह्या केल्या. तसेच १२-०२-२०२० ला सुद्धा श्री. जावळकर अनधिकृत गैरहजर होते. यादी दिवसाच्या गैरहजेरीची खतावणी केली होती पण ते दिनांक १३-०२-२०२० ला शाळेत आल्यावर लिहून असलेल्या गैरहजेरीच्या वर सही केली. त्या दिवसी शाळेचे मुख्ध्यापक UDISE Plus ची माहिती भरण्यासाठी कॅफे मध्ये गेले होते, त्यामुळे मुख्याध्यापक शाळेत येऊ शकले नाहीत हीच संधी साधून सदर शिक्षकाने हजेरीच्या रकाण्यात स्वतः जावळकर यांनी मुख्यध्यापकाची गैरहजेरी लिहिली. तो इथेच न थांबता दिनांक १४ फेब्रुवारी २०२० व १५ फेब्रुवारी या तारखाच्या हि गैरहजेरी लिहीली. जेव्हा मुख्यध्यापक शाळेत आले तेव्हा त्यांना हा त्यांच्या गैरहजेरीचा विचित्र प्रकार निदर्शनात आला. दिनांक १४ फेब्रुवारी २०२० ला मुख्यध्यापक यांनी त्या शिक्षकाला याचे स्पष्टीकरणार परंतु ते त्या दिवसी अनधिकृत गैरहजर होते. अध्यापन सोडून अनधिकृत गैरहजर राहत असल्याने शालेय विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मुख्याध्यापक यांना कोणतीच पूर्वसूचना देत नाही आणि शाळेतून वेळेच्या आधीच निघून जातो याबाबत गावातील लोकांनी त्याच्यावर तक्रार केली असता त्याच्या वर्तनात बदल झाला असल्याचे मुख्याध्यापक यांचे म्हणणे आहे. त्याच्या हजेरीच्या रजिस्टर वर खोड-खाड करण्याच्या प्रकारामुळे इतर शिक्षकावर परिणाम होऊ नये तसेच सतत गैरहजर राहण्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर व शाळेच्या गुणवत्तेवर परिणाम होईल. त्यांच्या अशा वागणुकीमुळे शाळेत अघटीत घटना घडू शकते, तरी या गोष्टींचा विचार करून योग्य कारवाई करावी अशी मुखाध्यापक यांनी लेखी निवेदन गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती झरी जामणी यांच्या कडे दिले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share