WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

जिल्हास्तरीय दीव्यांग क्रीडा स्पर्धेत यवतमाळ जिल्ह्यातून श्री रामदेव बाबा मूकबधिर विद्यालय अव्वल*..

ImageImage

यवतमाळ येथे घेण्यात आलेल्या दोन दिवसीय जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत लगतचा चिखलगाव येथील श्री रामदेव बाबा अपंग मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अव्वल स्थान प्राप्त केले.यवतमाळ जिल्ह्यातील संपूर्ण 36 शाळांना मागे टाकून वणी तालुक्याचे नाव उज्वल केले.

विद्यार्थ्यांनी धावणे,लांब उडी,गोळा फेक,स्पॉट जम्प,सॉफ्ट बॉल थ्रो आदी खेळात सहभाग घेतला..यात रामदेव बाबा विद्यालयातील मूकबधिर विदयार्थी आणि मतिमंद विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.

यात प्रथम स्थान पटकावणारे विद्यार्थी दीपक मेश्राम, समीर आत्राम,अजय गिरी,निकेतन माने,ललिता मेश्राम,सुरेखा टेकम,प्रांजली जाधव,किरण केलझलकर,सुरक्षा घोटेकर तसेच द्वितीय क्रमांक विशाल गायकवाड,अनिता आत्राम, कामाक्षी चोपणे आणि तृतीय क्रमांक सौरभ कोरम,सुरेखा टेकाम असे एकूण 24 पदक या विद्यार्थ्यांनी प्राप्त केले त्यात 17 पदक प्रथम स्थानाचे आहे.. विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक म्हणून सरोज जैन मॅडम, सेतु शर्मा मॅडम, विकी पेंदोर सर सोबत होते.

संस्थेचे अध्यक्ष दलीत मित्र श्री मेघराज जी भंडारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.शाळेचे मुख्याध्यापक जिनेंद्र भंडारी सर सहकारी शिक्षक लारोकर, बोधे,सुरेश मरकड, टीप्पणवार आदि परिश्रम घेतले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले