WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मनसेची ऑफर; पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांची माहिती द्या अन्…

Image

हिंदुत्वाचा नवा चेहरा आणि भूमिका धारण केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) राज्यातील परदेशी घुसखोरांबाबत आक्रमक झाली आहे. नुकतीच पुण्यात एक कारवाई केल्यानंतर आता मनसेने राज्यातील इतर भागांकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यानुसार, पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांची माहिती देणाऱ्या ५ हजार रुपयांचे बक्षीस मनसेनं जाहीर केलं आहे. औरंगाबादसह इतर काही ठिकाणी यासंदर्भात पोस्टर्स लावण्यात आली आहेत.

“घुसखोर हटाओ, देश बचाओ. पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांची अचूक माहिती पुराव्यानिशी देणाऱ्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रोख ५००० रुपये देण्यात येतील.” असा मजकूर या पोस्टर्समध्ये छापण्यात आला आहे. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटोही लावण्यात आला आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले