WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कोल्हापूर: बोर्डाची परीक्षा टाळण्यासाठी शिक्षकानेच विद्यार्थिनीला दिले किटकनाशक

Image

विद्यार्थ्यांसाठी दहावीची परीक्षा अत्यंत महत्वाची असते. करीयरला दिशा देणाऱ्या या परीक्षेत विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त गुण मिळवावेत, यासाठी शिक्षक नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात. पण कोल्हापूर जिल्ह्यात याउलट घटना घडली आहे. विद्यार्थिनीला दहावीची परीक्षा द्याची नव्हती. म्हणून शिक्षकाने तिला पिण्यासाठी किटकनाशके दिली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

या मुलीची दहावीच्या परीक्षेची तयारी झाली नव्हती. आजारी पडल्याचे कारण देऊन तिला परीक्षा टाळायची होती. शिक्षकाने दिलेले किटकनाशक पाण्यात मिसळून पिल्यानंतर या मुलीची प्रकृती खालावली. तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. या मुलीच्या मृत्यूनंतर विष प्राशनाच्या या प्रकरणात शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली.

गुरुवारी अटक करण्यात आलेल्या या शिक्षकाने मुलीला विषारी द्रव्य दिल्याचे कबूल केले आहे. या शिक्षकाला सहा मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. २० फेब्रुवारीला मुलगी प्रॅक्टीकल परीक्षेसाठी शाळेत गेली होती. त्यावेळी अस्वस्थ वाटत असल्याचे तिने सांगितले. तिला लगेच कोल्हापूरमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाच दिवसांनी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मुलीच्या मागणीवरुन तिला किटकनाशके दिल्याचे आरोपी शिक्षकाने सांगितले. विद्यार्थिनीला प्रोत्साहन देण्याऐवजी तिला किटकनाशक का दिली? यामागे शिक्षकाचा काय हेतू होता याचा तपास करण्यात येणार आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले