WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अपहरण करुन मुलीची गोळी घालून हत्या, तीन दिवसांनी सापडला मृतदेह

Image

पंजाबमधील अमृतसर येथून तीन दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या १८ वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला आहे. शुक्रवारी रात्री एका निर्जनस्थळी मुलीचा मृतदेह सापडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बुधवारी संध्याकाळी मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं. मुलगी ब्युटी सलूनमध्ये प्रशिक्षणासाठी जात असताना तिचं अपहरण करण्यात आलं होतं.

मुलीच्या कुटुंबाने त्याच दिवशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मुलीची सुटका करण्यासाठी अपहरणकर्ते २० लाखांची मागणी करत असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं होतं. पोलिसांनी सांगितल्यानुसार, “तपासादरम्यान आम्हाला एका निर्जनस्थळी मुलीचा मृतदेह सापडला. गोळी घालून तिची हत्या करण्यात आली आहे”.

पोलीस निरीक्षक सुखविंदर सिंग रंधवा यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मुलीच्या एका वर्गमित्राला अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी केल्यानंतरच मृतदेह आमच्या हाती लागला”.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले