WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

28 लाख रुपये घेऊन पसार झालेला आरोपी याचे शव खैरगाव ते गाडेगाव येथील रोडलगत असलेल्या नाल्यात मिळाला ...

Image

20 फेब्रुवारी रोजी बँकेतून एटीएम मध्ये टाकण्यासाठी 28 लाख रुपये घेऊन पसार झालेला आरोपी संतोष वाटेकर याचे शव कोरपना तालुक्यातील खैरगाव ते गाडेगाव येथील रोडलगत असलेल्या नाल्यात मिळून आले. तब्बल 8 दिवसानंतर संतोषाचा मृतदेह मिळून आल्याने वणीकरांत अनेक चर्चेला पेव फुटले आहे. संतोष रामचंद्र वाटेकर(35) हा वणीतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये कॅश टाकणाऱ्या कंपनी एपीएस लॉजी कॅश सोल्युशन प्रा. ली. येथे गेल्या आठ वर्षांपासून कार्यरत होता. 20 फेब्रुवारी रोजी अशाच प्रकारची कॅश टाकण्याकरिता तो 28 लाख रुपये घेऊन निघाला. परंतु ही रक्कम त्याने एटीएम मध्ये भरली नाही. त्यावेळी स्टेट बँकेकडून संतोषच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी संतोषावर गुन्हा दाखल केला होता. सोबतच संतोषच्या भावाने तो हरवल्याची तक्रार वणी पोलिसात दिली. तक्रार मिळताच पोलीस यंत्रणा त्याचा शोध घेत होती. परंतु संतोष कुठेही मिळून आला नाही. अचानक शनिवारी 29 फेब्रुवारी रोजी दुपारी संतोष याचे शव हे कोरपना तालुक्यातील खैरगाव ते गाडेगाव रोडवरील नाल्याजवल मिळून आल्याने एकाच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मेंढपाळ असलेल्या एका व्यक्तीने खैरगाव येथील पोलीस पाटलास दिली. पोलीस पाटलांनी लगेच कोरपना पोलोसात याबाबत माहिती दिली. कोरपना पोलिसांनी त्याच्या हातावर संतोष हे नाव गोदवून असल्याने या नावाचा कुणी व्यक्ती मिसिंग असल्याची माहिती घेतली. असा संतोष नामक व्यक्ती हा वणीतून मिसिंग असल्याची माहिती मिळाली. कोरपना पोलिसांनी याबाबत वणी पोलिसांना माहिती दिली. वणी पोलीस आरोपीच्या भावाला आरोपीची ओळख पटविण्याकरिता सोबत घेऊन गेले. त्याच्या भावाने सदर मृतदेह हा संतोषचा असल्याची माहिती दिली. त्यानंतर संतोषाचा मृतदेह हा वणी येथे त्याच्या घरी आणण्यात आला. परंतु संतोषच्या पत्नीने हा मृतदेह आपल्या पतीचा नसल्याचे संगीतल्याने काही काळ पोलोसांची चांगलीच तारांबळ उडाली होती. जवळपास एक दीड तासानंतर त्याची पत्नी व परिवारातील व्यक्तीने सदर शव हे संतोषचेच असल्याचे मान्य केले. सदर शव हे जरी संतोषचे असले तरी ते त्या ठिकाणी कसे पोहचले? त्याच्या मृतदेहास डिझेल टाकून जळण्याचाही प्रयत्न केला असल्याचे समजते. सोबतच त्याच्याजवळ असलेली रक्कम कुठे गेली ? त्याची हत्या की, घातपात झाला? यामागे कोण आहे ? असे अनेक प्रश्न आता पोलिसांपुढे 'आ' करून उभे आहे. संतोषच्या अचानक झालेल्या मृत्यूने त्याचा परिवार हादरून गेला आहे व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share