WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

विवाहबाह्य संबंधांच्या आरोपावर विद्या चव्हाणांच्या सुनेनं दिलं उत्तर, म्हणाल्या…

Image

मुलगा हवा म्हणून कुटुंबीयांनी आपला छळ केला. मला पहिली मुलगी होती, त्यानंतर दुसरीही मुलगी झाली. त्यानंतर कुटुंबीयांकडून अधिक छळ करण्यात आला,” असा दावा विद्या चव्हाण यांच्या सुनेकडून करण्यात आला आहे. मंगळवारी विद्या चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत आपल्या सुनेचे विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती मुलाला मिळाली असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता त्यांच्या सुनेची प्रतिक्रिया समोर आली आहे.

“आपले विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप हा खोटा आहे. जेव्हा मी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली त्यावेळी कुटुंबीयांनी माझ्याविरोधात पुरावे गोळा करून बदनाम करण्याची धमकी दिली होती. त्यांना आता तेच केलं आणि माझ्याविरोधात कट रचला,” असा दावा त्यांनी केला.

“आपल्याला मुलगा झाला नाही म्हणून कुटुंबीयांकडून छळ करण्यात आला. माझ्या दीरानंही माझा मानसिक छळ केला. अशा गोष्टींबाबत मी आता गप्प बसणार नाही हे त्यांना समजल्यानंतर त्यांनी मला घराबाहेर काढलं. तसंच लहान मुलीपासूनही मला वेगळं केलं आहे. जेव्हा मी त्या घरात राहू देण्याची विनंती केली तेव्हा त्यांनी मला आणि माझ्या वडिलांना मारून घराबाहेर काढलं. त्यानंतर मी पोलीस स्थानकात जाऊन त्यांच्याविरोधात तक्रार केली,” अशी माहिती त्यांच्या सुनेनं दिली. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले