WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मित्राबरोबर बोलत उभी होती… अन् पुढच्या क्षणाला इमारतीवरुन उडी मारुन केली आत्महत्या

Image

नागपूरमध्ये एका २४ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास शहरातील मानकापूर पोलीस स्थानकांच्या हद्दीमध्ये इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन या तरुणीने आत्महत्या केली. अंकिता माकोडे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव असून ती चांगल्या पदावर कामाला होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंकिता ही शहरातील राज पॅलेस येथील बीझ प्रोस्पेक्टस या कंपनीमध्ये काम करायची. काल दुपारी अंतिकाने ज्या इमातरीवरुन उडी मारली त्या इमारतीखाली ती तिच्या मित्राबरोबर बराच वेळ गप्पा मारत उभी असल्याचे अनेकांनी पोलिसांना सांगितलं. या दोघांमध्ये वाद झाल्यानंतर अंकिता तिथून निघून गेल्याचेही अनेकांनी पाहिले.

आपल्या मित्राबरोबर वाद झाल्यानंतर रागाच्याभरात अंकिता इमारतीच्या चौथ्या मजल्यावर गेली आणि तिथून उडी मारत तिने आत्महत्या केली. नक्की अंकिता आणि तिच्या मित्रामध्ये काय बोलणे झाले?, दोघांमध्ये वाद नक्की कशामुळे झाला ज्यानंतर अंकिताने थेट आत्महत्या करण्याचा टोकाचे पाऊल उचलले अशा अनेक प्रश्नांचा उत्तरे अद्याप समोर आलेली नाही. या प्रकरणात पोलीस सध्या तपास करत असून अंकिताच्या मित्राची चौकशी केली जाणार असल्याचे समजते. सध्या या प्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरु केला आहे

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले