WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भारतात कोरोनाचे १३ पॉझिटिव्ह रुग्ण : आग्रा येथे ६ नवे रुग्ण आढळले

Image

चीनमधून जगभरात पाय पसरत असलेल्या कोरोना विषाणूनेभारतातही  खळबळ माजवली आहे. सोमवारी दिल्ली, जयपूर, तेलंगणा आणि केरळमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर मंगळवारी आग्रा येथे कोरोनाचे सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. जयपूरमध्ये एक इटालियन नागरिक कोरोनाग्रस्त आढळून आला आहे. देशातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३ झाली आहे.

केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार देशात सहा कोरोनाग्रस्त आढळले आहेत. उत्तर प्रदेशच्या आरोग्य विभागाने आज राज्यात सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती दिली. त्यांचा चाचणी अहवाल पुण्याच्या राष्ट्रीय संसर्गजन्य आजार संशोधन संस्थेत पाठविण्यात आला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णाची मुले शिकत असलेल्या नोएडातील दोन शाळा सावधगिरी म्हणून बंद करून परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले