WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वरांगना वस्तीत क्रांती युवा कडून 50 किटांचे योगदान.. माणुसकीची जाण तोच खरा दायावाण :- क्रांती युवा संघटनेकडून वारांगणांना मदतीचा हात...

Image

लोकडाऊनच्या काळात दाखवली माणुसकी...

वणी :- सुरज चाटे, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी.

कोरोना मुळे भारतात लॉक डाउन सुरू असताना गोरंगरिबांचे जगणे म्हणजे तारेवरची कसरत झाले आहे वारांगना वस्तीत गेल्या बरेच दिवस क्रांती युवाकडून डब्यांचे वाटप करण्यात आले मात्र त्यापलिकडे जाऊन त्यांना आपण जीवनावश्यक किट चे सुद्धा वाटप केले पाहिजे या एक मात्र भावनेने माणसातील माणुसकी ची जाण ठेवत वणीतील वारांगना वस्तीत 50 जीवनावश्यक किट वाटप पोलीस विभागाच्या उपस्थितीत करण्यात आले.

वणीतील वारांगना वस्तीला प्रेमनगर म्हणून सुद्धा ओळखल्या जाते त्यात बरेच कुटुंब उदरनिर्वाह करीत असल्याने कोरोनासारख्या भयावह परिस्थितीत त्यांच्या देहविक्रीच्या व्यवसायाला लॉक बसला असून संसर्ग जन्य आजार असल्यामुळे परिस्थिती बिकट स्वरूपाची झाली आहे त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती सदर बाब लक्षात घेता दानशुराणी जमेल त्या पद्धतीने मदत केली परंतु यांत क्रांती युवा संघटनेने सुद्धा महत्वपूर्ण योगदान देत लॉक डाउन सुरू झाले तेंव्हापासून जेवणाचे डबे तर नंतर कुटुंबियांच्या दृष्टीकोनातून तात्काळ सर्व सदस्यांना बैठक घेत रोज लागणाऱ्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तूचे पॅकिंग करून किट तयार करण्यात येऊन 50 जीवनावश्यक किट चे वाटप तेथील कुटुंबियांना करण्यात आले यावेळी पोलीस विभागातील सुधीर पांडे, सुनील खंडागळे, राकेशभाऊ खुराणा, अविनाश भुजबलराव, निलेश कटारिया, राजू गव्हाणे, कपिल जुनेजा, वैभव खडसे, मारोती खडतकर, विजू गव्हाणे, दिनेश आदी सोशल डिस्टन्स चे नियम पाळत सहकार्य करीत होते.

सादर मदत देऊन त्यांना संघटनेतर्फे माणुसकीचा हाथ देऊन होणाऱ्या खर्चात हातभार लावून एक माणुसकी दाखविण्याचा प्रयत्न संघटने कडून करण्यात आला आहे, या संघटनेच्या उपक्रमाने वणीसह परिसरात सर्वत्र संघटनेचे कौतुक होत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share