वणी घोन्सा रोडवरील ट्रक दुचाकीच्या अपघातात दोन तरुण गंभीर जख्मी





प्रशांत चंदनखेडे वणी :-
ट्रकच्या मागून दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात दोन तरुण गंभीर जख्मी झाल्याची घटना वणी - मुकुटबन रोडवरील वॉटर प्लांट जवळ काल रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. वेकोलिच्या घोन्सा खदानीमधून कोळशाची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकच्या पाठीमागून MH २९ T १५८७ क्रमांकाची दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवर सवार असलेले दोन्ही तरुण गंभीररित्या जख्मी झाले आहेत. पंकज गोपाल महाजन (२३) व अमित राजू दुबे (२२) ही जख्मी झालेल्या तरुणांची नावे असून त्यांना अत्यवस्थ स्थितीमध्ये आधी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तर प्राथमिक उपचारा नंतर त्यांना चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे.
काल २७ जुलैला वणी घोन्सा रोडवर दोन अपघात झाल्याचे समजते. एक दुचाकी लोड गाडीच्या पाठीमागून तर एक खाली गाडीच्या पाठीमागून धडकल्याचे प्रत्यक्ष दर्शींनी सांगितले असून त्यातील एका दुचाकीवरील अपघातग्रस्त तरुणांची पोलिसांकडून माहिती मिळाली आहे. हे दोन्ही जख्मी तरुण मुरधोनी येथील रहिवासी असून ते घराकडे जात असतांना कोळसा वहन करणाऱ्या ट्रकच्या मागील भागात धडकल्याने गंभीर जख्मी झाले. त्यांना चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहे.