तालुक्यात नुकत्याच तीन व्यक्तींनी केलेल्या आत्महत्यांमुळे मागील काही दिवसांत ३२ आत्महत्यांची झाली नोंद
रोगराई घेऊन आलेलं हे वर्ष सर्वांसाठीच वेदनादायी ठरलं आहे. रोगराईमुळे संपूर्ण देशाची व देशातील जनतेची वाताहत झाली आहे. रोगराईच्या या काळात अनेक संकटं निर्माण झाल्याने संकटाचा सामना करतांना कित्येकांचे तोल गेले आहेत. रोगराईच्या प्रकोपामुळे देशात टाळेबंदी करण्यात आल्याने रोजगाराची वानवा होऊन नागरिकांमध्ये आर्थिक दुर्बलता निर्माण झाली. मानवी रोगराई बरोबरच शेतमालांवरही रोगराई आल्याने शेतकरीही आर्थिक संकटात आला. रोगराईमुळे निर्माण झालेल्या संकटात प्रत्येकच जण होरपळून निघाल्याने मानसिक खचीकरण होऊन कित्येकांनी टोकाचे निर्णय घेतले आहेत. जबाबदारी व आव्हाने न पेलल्या गेल्याने नैराशेच्या गर्तेत आलेल्या तसेच परिस्थितीचा सामना करण्यात अपयशी ठरलेल्या नागरिकांनी जीवनातून एक्झिट घेतल्याने तालुक्यात आत्महत्यांचे सत्रच सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. कुणी आर्थिक विवंचनेतून तर कुणी कौटोम्बिक चिंतेतून, कुणी आजाराला कंटाळून तर कुणी कर्जबाजारीपणातून, कुणी व्यसनाधीनतेला बळी पडून तर कुणी पारिवारिक कलहातून मरणाला जवळ केले आहे. हल्ली ९ डिसेंबरला अंकित संजय दातारकार (२३) रा. मोहर्ली या युवकाने दारूच्या नशेत शेतात विषारी द्रव्य प्रश्न केल्याने त्याचा चंद्रपूर येथे रेफर केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. १७ डिसेंबरला किशोर गणपत मडावी (३०) रा. इस्लामपुरा गांधीनगर या युवकाचा सायंकाळी ५ वाजता निळगुडा नदीपात्रात मुतदेह आढळून आला. मागील एक वर्षांपासून हा युवक आजाराने ग्रस्त असल्याचे समजते. १७ डिसेंबरलाच सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान बोरगांव येथील एका ३५ वर्षीय महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पती पासून विभक्त माहेरी रहात असलेल्या या महिलेला डोकेदुखीचा त्रास असल्याचे समजते. खूप वेळपर्यंत घराचा दरवाजा बंद असल्याने शेजाऱ्यांनी दरवाजा तोडला असता सदर महिला पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. या सततच्या आत्महत्यांनी तालुका हादरला आहे.
मागील काही दिवसांत तालुक्यातील ३२ महिला पुरुषांनी विविध कारणांनी जीवनाला कंटाळून आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेतले आहे. कोरोना या साथीच्या आजाराच्या वाढत्या प्रकोपामुळे करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे देशाचं व जनतेचं अर्थचक्रच कोलमडल्याने विपरीत परिस्थितीशी सामना करताना अनेकांचा तोल गेल्याने त्यांनी जीवनातूनच माघार घेतली. रोगराई घेऊन आलेलं हे वर्ष प्रत्येकांसाठीच दुर्दैवी ठरलं. तालुक्यात या काळात घरघुती वादातून १३ जणांनी, नापिकीला कंटाळून दोन शेतकऱ्यांनी, कर्जबाजारीपणामुळे दोन जणांनी, आजाराला कंटाळून सहा जणांनी, व्यसनाधीनतेला बळी पडून पाच जणांनी तर मानसिक स्थिती ढासाळलेल्या एका व्यक्तीने जीवन त्यागून मरणाला जवळ केले. मागील काही दिवसांपासून तालुक्यात आत्महत्येचे सत्रच सुरु असून सातत्याने होणाऱ्या आत्महत्यांनी तालुका हादरला आहे.