WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शिवणी (धोबे) येथे नवनियुक्त बँक संचालकांचा सत्कार;घनश्याम पा. धोबे यांची केली बँकेच्या सल्लागारपदी नेमणूक

Image

कुमार अमोल

मारेगाव | शिवणी (धोबे) येथील मित्रपरिवारातर्फे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवनियुक्त बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच इतर संचालक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सभापती श्री. नानाजी प. खंडाळकर, प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. टिकारामजी कोंगरे, उपाध्यक्ष श्री. संजय देरकर, संचालक राजूभाऊ येल्टिवार, जी. प. माजी सभापती तथा सदस्या सौ. अरुणाताई खंडाळकर, जी.प.सदस्य अनिल देरकर, वसंत जिनिंगचे संचालक ऍड. भास्कर ढवस, एकविरा महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. किरणताई देरकर , वसंतराव आसुटकर, प्रमोद वासेकर, डॉ.मोरेश्वर पावडे, तसेच कुचनकर सरपंचा सौ. शशिकला काटवले उपस्थित होत्या.

यावेळी सत्काराला उत्तर देतांना टिकारामजी कोंगरे यांनी लवकरच हिवरा मजरा येथे मध्यवर्ती सहकारी बँक शाखा निर्माण करण्यात येईल. शेतकऱ्यांना एक लाखापर्यंत व्याज माफ करण्यात येईल. यापुढे शेतकऱ्यांना कर्जासाठी जास्त कागदपत्रे करावी लागणार नसून वेगवेगळ्या योजनांची माहिती शेतकऱ्यांना देऊन त्यांना या योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कोंगरे म्हणाले. यावेळी संजय देरकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन भास्कर राऊत यांनी, प्रास्ताविक घनशामजी धोबे यांनी तर आभार प्रदर्शन मारोती गौरकार यांनी केले. कार्यक्रमाला तालुक्यातील शेकडो शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.