WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीच्या मुख्य उपडाकघर परिसरातील झाडाला भीषण आग....

ImageImageImage

तब्बल 4 घंटे चालली आग :- कोणताही जीवित हानी नाही समयसुचकतेमुळे आग आटोक्यात.....

सुरज चाटे - वणीतील मुख्य डाकघर कार्यालया जवळ असलेल्या एका झाडाला दिनांक 1 मे ला सकाळी 6 वाजताच्या दरम्यान भीषण आग लागल्याने एकच गोंधळ उडाला होता त्या आगीत काही दुकाने सुद्धा आले असून वेळेवर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचून आगेवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असून सदर झाड हे सुकले असल्याने आगेचा जोर अधिक दिसून आला त्यामुळे त्या झाडाच्या आगेवरील नियंत्रणा करीता अग्निशमन दलाला कमालीची कसरत करावी लागली अखेर 2 गाड्या पाणी मारल्यानंतर आग नियंत्रणात येऊन सदर झाडाला पाडण्यात आले.

दिनांक 1 मे महाराष्ट्र तथा कामगार दिन म्हणून साजरा केला जातो 1 मे च्या पहाटेच कर्तव्य दक्ष वणी येथील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या हुषारीसह अतिशय कमी वेळात आगेवर नियंत्रण मिळविले आहे, वणीच्या मुख्य डाकघराच्या जवळच असलेल्या एका मोठ्या झाडाला अचानक सकाळी 6 वाजताच्या सुमारास आग लागली होती, परंतु ही आग नेमकी कशी लागली याबाबत अजूनतरी स्पष्टीकरण नसून जसे जसे आगेचे भडके वाढत गेले तसे तसे ती आग लोकांच्या निदर्शनास येऊ लागली दरम्यान आग दिसताच परिसरात एकच गर्दी उडाली, सदर ठिकाणी अग्निशमन दल तथा वणी पोलीस व वाहतूक पोलीसांना पाचारण करून सदर आग विझविण्यात आली, महत्वाच म्हणजे वणी नगर परिषदेचे अग्निशमन दलाचे वाहन हे पूर्णतः जीर्ण असून सुद्धा यावेळी त्याच वाहनाने आग विझवली मात्र जर ते नादुरुस्त वाहन कामी आले नसते तर वणी नगर परिषदेकडे दुसरा पर्यायी उपाय काय? असा प्रश्न देखील या नादुरुस्त वाहनाकडे पाहून पडत असून अखेर नवीन वाहन येणार तरी केव्हा? मोठी हानी झाल्यावर की काय? असा प्रश्न वाणीकरांना पडला आहे, सदर झाडाची आग विझवून झाड पाडण्यात आले यावेळी वाहनचालक देविदास जाधव, फायर फायटर श्याम तांबे, नरेंद्र वीरा या अपुऱ्या कर्मचाऱ्यांनी का होईना आग मात्र विझवली असून त्यांनी मोठ्या शिताफीने आग नियंत्रणात आणली.

सद्या उन्हाचा पारा सारखा वाढत असून वणी सह परिसरात उष्णता जास्त प्रमाणात असल्याने कधी कुठे आग लागणार याचा नेम उरला नसून, वणीत मोठ्या प्रमाणात जिनिंग असून त्यांना आग लागण्याच्या घटना सारख्या वाढत असतात अशातच वणीतील अग्निशमन सेवा ही नादुरुस्त असल्याने व सर्वात महत्वाचे म्हणजे अपुरा कर्मचारी वर्ग, एकच चालकावर टँकर, अग्निशमन आदी वाहनाचा भार असल्याने व फायर फायटर सुद्धा पुरेशे व अनुभवी नसल्याने कधी कोणती मोठी घटना घडून जर मोठी हानी झाली तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत असून, नवीन अग्निशमन गाडीची मान्यता दिली मात्र नवीन गाडी अजूनपर्यंत पोहोचली नसून जुनी गाडी ही अतिशय जीर्ण झाली आहे जर एकाच वेळी दोन ठिकाणी आग लागली तर अश्यावेळी करायचे तरी काय? अशावेळेस होणाऱ्या परिणामास जबाबदार कोण राहणार असा सवाल आजच्या या घटनेतून निर्माण होत असून संबंधित मुख्याधिकारी व अधिकारी वर्ग यांनी तातडीने अशा गंभीर समस्या कडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असून वेळेच्या आदी सावधगिरी घेणे महत्वाचे झाले आहे, नाहीतर मोठी घटना घडल्यानंतर लक्ष देण्यात काही महत्व राहणार नाही, याची वेळीच दखल घेण्याची गरज आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share