WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

३ रे काव्यंगण राज्यस्तरीय कवी संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

ImageImage

बेटी फाउंडेशन वणी यांचे वतीने ३रे काव्यंगण राज्यस्तरीय कवी संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा दिनांक ९ जून २०१९ ला गंगशेट्टीवार मंगल कार्यालय वणी येते मोठ्या उत्साहात पार पडला आहे. या कवी संमेलनात सम्पूर्ण महाराष्ट्रतील मोठ्या संख्येने कवी सहभागी झाले होते.

वणी शहराला साहित्यिक, लेखक,कवी यांचे माहेर घर म्हटले जाते.तसेच आज पर्यंत शहरातुन अनेक साहित्यिकांची कर्मभूमी देखील ठरले आहे.दि ९ जून ला सकाळी १० वा.उद्घाटन सोहळा पार पडला.या भव्य सोहळ्याचे उद्घाटक म्हणुुन इंदिरा सह.सुतगिरणीचे अध्यक्ष सुनील कातकडे होते.,स्वागताध्यक्ष सौ किरणताई देरकर प्रमुख पाहुणे मिनाज शेख, इज़हार शेख, दिलीप काकडे,पंडित काळे,लक्ष्मीकांत धानोरकर,आदि मान्यवरांच्या उपस्थितीत होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक करते वेळी बेटी फाऊंडेशन चा मुळ ऊद्देश समाजासमोर मांडताना संस्था अध्यक्षा प्रिती माडेकर ह्यांनी सांगितले की प्रत्येक निराधार, अनाथ ,अपंग मुलीला त्यांच्या हक्काचं छत ,माहेरघर आम्ही ऊभारुन देणार आहोत, समाजातील अशा असुरशित मुलींना स्वताचे नाव देऊन त्यांचा सांभाळ बेटी फाऊंडेशन करेल.

राज्यस्तरीय कविसंम्मेलन सोहळ्याला महाराष्ट्रातील शंभराहुन अधिक कवी ऊपस्थित होते,महाराष्ट्रात धडाधडीचे समाजकार्य करणार्या महिलांना रणरागिणी पुरस्कार आणि पुरूषांना अष्टपैलु समाजसेवक पुरस्कारात शाल श्रीफळ,सन्मानचिन्ह, व प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णु जोंधळे व आभार मीना वानखेडे यांनी मानले तसेच या कार्यक्रमात महाराष्ट्रातील कवी व साहित्यिक सहभागी झाले होते. शहरातील व परिसरातही साहित्यप्रेमीनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share