WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीत चिमुकलीवर अत्याचार....आरोपिला तात्काळ अटक....

Image

- प्रतिनिधी सागर मुने, वणी

शहरात पुन्हा लज्जा स्पद घटना घडली. आता लहान चिमुकल्या मुलींवर सुद्धा अत्याच्याराच्या घटना घडायला सुरुवात झाली. तालुक्यातील गणेशपूर येथे ही घटना घडली व पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे.

अशीच एक घटना शहरानजीक असलेल्या गणेशपुर येथे घडली आहे.

छबन बापुराव आस्कर असे नराधमाचे नाव असुन आरोपिने आपल्या घराशेजारीलच एका पाच वर्षिय चिमुकल्या मुलीवर अत्याचार केला आहे.हि घटना दि.5 डिसेंबर दुपारच्या सुमारास घडली अाहे. चिमुकली आपल्या अंगणात खेळत असतांना छबनने त्या मुलीला तंबाकाची पुडी आणन्याच्या बहाण्याने घरात बोलावले व त्या चिमुकलीवर अत्याचार केला.या घटनेची माहिती सदर मुलीने आपल्या आई वडीलांना दिली.

यानंतर पती पत्नीने मिळुन त्याला विचारना केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. घटनेला चार दिवस लोटुन गेले.काय करावे त्यांना कळत नव्हते. काही नातेवाईकांनी त्यांना धिर दिला व अत्याचार करणार्याला शिक्षा झालीच पाहीजे म्हणुन वणी पोलीसात येवुन रितसर तक्रार दाखल केली.या तक्रारी वरुन पोलीसांनी 376,ऐ बी 4,6 पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करुन आरोपिला तात्काळ अटक केली.

सदरचि कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक,पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि माया चाटसे यांनी केली.

ग्रुप शी जुडण्यासाठी लिंक वर क्लिक करा 👉 www.wanicity.com

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share