WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

महत्वाची बातमी : बारावी पास असणाऱ्यांसाठी राज्यात ७००० जागांची मेगाभरती

Image

Maharashtra Security Force Recruitment : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाने पुरूष सुरक्षा रक्षक पदासाठी सात हजार जागांसाठी भरती प्रक्रीया सुरू केली आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीनं असेल. ७००० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च २०२० आहे. इच्छुक उमेदवारांना बारावीत किमान ५० टक्के गुण असणं अनिवार्य आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमाह १७ हजार रूपयांचं वेत दिलं जाईल. शिवाय इतर भत्तेही मिळणार आहेत.

असा करा अर्ज –

MSSC चे अधिकृत संकेतस्थळ mahasecurity.gov.in वर जा

‘Recruitment’ च्या लिंक वर क्लिक करा

आता नव्या पेजवर Apply Online For Post of Security Guard या पर्यायावर क्लिक करा

क्लिक करताच अॅप्लिकेशन फॉर्मचं पेज उघडेल

आता तेथे विचारलेल्या डिटेल्स (तपशील) भरत जा

अर्ज [Register] केल्यानंतर उमेदवारास Application ID प्राप्त होईल. हा Application ID पुढील सर्व प्रक्रियेसाठी महत्वाचा असलेले उमेदवारांनी तो काळजीपूर्वक जतन करावा.

शुल्क भरल्यानंतर आपले छायाचित्र स्कॅन करून अपलोड करा.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share